खेळ / क्रीडा धामणगाव रेल्वे

६ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत धामणगाव च्या कराटेपटुंचा बोलबाला

अनेकांनी सुवर्ण पदकाला घातली गवसणी

धामणगाव रेल्वे 

श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य द्वारा आयोजित ६ वी खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा ८ मार्च २०२६ ला इंडो स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल अमरावती येते घेण्यात आली होती. या कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध १० ते १७ वयोगटातील एकूण ३५० मुलांचा काता व कुमिती मध्ये सहभाग नोंदविला होता. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, गटनेता चेतन गावंडे, व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश जाधव यांची उपस्थिती लाभली.
 सेनसाई उमेश मोहळे व चेतन वाटणकर यांच्या हस्ते धामणगावतील बोधी बुडोकान कराटे च्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामध्ये आरोही राठोड काता मध्ये सुवर्णपदक, पृथ्वीका ढबाले काता व कुमिती मध्ये सुवर्णासह सिल्वर पदक, नंदिनी भेंडे काता व कुमिती मध्ये सुवर्णासह सिल्वर पदक, सान्वी दे हिला काता व कुमिती मध्ये सिल्वर सह ब्राँझ पदक, रुद्रानी मेटे काता मध्ये ब्राँझ पदक, जानवी राऊत काता व कुमीती मध्ये सिल्वर सह ब्राँझ पदक, अंश समर्थ काता व कुमिती मध्ये सिल्वर पदक असे धामणगावतील अनेक विध्यार्थ्यानी पदकावर आपले नाव कोरले आहे. तसेच यावेळी मास्टर सम्यक दहाट व मास्टर सोनाली गुप्ता यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
सर्व विध्यार्थी यांनी आपल्या यशाचे श्रेय भन्ते धम्मसार, मास्टर मुकेश कांबळे, मास्टर आकाश पवार , मास्टर सचिन मून तसेच आपले आई-वडील यांना देत त्यांचे आभार मानले. याशिवाय विध्यार्थ्यांच्या पालकांनी व धामणगावातील नागरिकांनी सर्वांचे कौतुक करीत अभिनंदन करून त्याच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!