धामणगाव रेल्वे

देवगावचे नितेश रूपवने आणि पूजा हजारे शासकीय सेवेत रुजू

भूमिपुत्र क्रिकेट क्लब व यशोधरा बौद्ध महीला मंडळ देवगाव तर्फे जाहीर सत्कार

धामणगाव रेल्वे

मेहनत, जिद्द आणि चिकाटी उराशी बागळून सर्वोतपरी प्रयत्न करणाऱ्या देवगाव येथील नितेश विजय रूपवने आणि पूजा राजेंद्र हजारे यांनी जीवनातील यशाची पायरी गाठली आहे. त्यामुळे तालुक्यातील देवगावचे नाव रोशन झाले.

   

पूजा हजारे आणि नितेश रूपवने यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर

त्याकरिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून नितेश विजय रुपवने यांची महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामध्ये लेखाधिकारी / लेखापरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल तसेच कुं. पूजा राजेंद्र हजारे हीची महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज विभागामध्ये ग्रामसेवक पदावर निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी दिलीप पाटील, विजय रूपवने, रवि ससनकर, मोबिन अकबानी, भारत पाटील, बलरामजी इंगोले सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!