धामणगाव रेल्वे

कर्जापायी शेतकऱ्याची स्वतःच्या विहरीत उडी घेऊन आत्महत्या

वसाड येथे घडली घटना

धामणगाव रेल्वे

सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा मनात घर करून बसल्याने शेतकऱ्याने आपले जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील वसाड या गावात घडली असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दिनेश वसंत पाचबुद्धे, वय ५० वर्ष रा. वसाड असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक दिनेश पाचबुद्धे हे आपल्या संसाराचा गाढा चालविण्यासाठी वडिलोपार्जित शेती तसेच मिळेल ते काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांनी शेतीवर दिड लाख तसेच इतर ठिकाणाहून ३ लाख असे कर्ज काढले होते. शेतीच्या उत्पादनातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू असे मनात असताना सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढतच चालल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनप्रवास संपविला असल्याचे त्यांचा मुलाचे म्हणणे आहे.
दि. १ एप्रिल २६ रोजी घरच्यांना व नागरिकांनी सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी मंगरूळ द. पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार शरद आहेर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उप निरीक्षक महादेव पोकडे, पोलीस कॉन्स्टेबल जय गवळी यांनी घटनास्थळी दाखल होत रात्री १ वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र विहिरीला पाणी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने मृतदेह बाहेर काढता आला नाही. त्यामुळे आज सकाळी एकाच विहिरीवर ३ मोटार बसवून पाणी खाली करण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. मृतक दिनेश पाचबुद्धे यांच्या पश्चात पत्नी सिंधू पाचबुद्धे, मुलगा योगेश पाचबुद्धे वय – २१, दर्शन पाचबुद्धे वय – १९ असा आप्त परिवार आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!