धामणगाव रेल्वे शेती विषयक

नाफेड चना खरेदी केंद्रातील गोंधळ प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

योगेश थाडे सह सुरज गंथडे यांची संपूर्ण चौकशीची मागणी

धामणगाव रेल्वे 

दि. २२ मार्च रोजी गुरु गजानन ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या वतीने धामणगाव येथील खत्री जिनींग अँड टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मध्ये नाफेड मार्फत चना खरेदी केंद्रावर सकाळपासून मोठा गोंधळ उडाल्याने धामणगाव परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्यामध्ये खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होत असून त्यांचीआर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. तसेच व्यापाऱ्यांचा माल विना चाळणी मारल्याने विक्री होत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रहार पक्षाचे तालुका प्रमुख सुरज गंथडे यांनी संस्था चालकांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे जवळपास ६ तास कामकाज बंद होते. दरम्यान विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही राजकीय लोकांकडून करण्यात आला असताना पोलिसांना पाचारण करण्यात आल्याने प्रकरण नियंत्रणात राहिले मात्र संस्थाचालकांकडून मनमानी कारभार करीत शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय पाहता सदरचे प्रकरण जिल्हाकार्यालयात पोहोचले असून नाफेड चना खरेदी सुरु झाल्यापासून संपूर्ण दिवसाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख योगेश थाडे सह प्रहारचे तालुका प्रमुख सुरज गंथाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तक्रारीनुसार गुरु गजानन ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या वतीने नाफेडची शासकीय चना खरेदी सुरु असून मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांची लूट याठिकाणी सुरु आहे जसे कि, धामणगाव एपीएमसी मध्ये प्रति क्विंटल २७.५० पैसे हमाली असतांना शेतकऱ्यांकडून ४० रुपये प्रति क्विंटल वसुली केली जात आहे. नाफेड चना खरेदी सुरु झाल्यापासून कुठ्लानी नाफेडचा अधिकारी कर्मचारी ग्रेडर हजर नसल्याने तिथला संस्थाचालक शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरून त्यांच्यावर अन्याय करून मनमानी कारभाराने चना खरेदी करीत आहे. त्यामुळे पाहिल्या दिवसापासून सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्या कंपनीची चौकशी करून त्यांचे लायसन्स रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसे न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी हे कंपनीच्या विरोधात बेमुदत आंदोलन करणार असा इशारा यावेळी सुरज गंथडे व योगेश थाडे यांच्यावतीने देण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!