प्रश्न विचारले म्हणून हिसकावले ओळखपत्र – महेंद्र भगत, पत्रकार
अंजनगाव सुर्जी : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी तालुक्यातील एका पत्रकारासोबत अरेरावी करत “तू कुठला आणि कोणत्या पेपरचा पत्रकार, दाखव तुझी आयडी” असे म्हणत पत्रकाराचे ओळखपत्र हिसकावल्याची घटना उघडकीस आली.
आठवडी बाजार येथे मासेमारी व्यावसायिकांनी लावलेल्या दुकान हटविण्याची कारवाई मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या आदेशाने नगर परिषदेकडून करण्यात आल्याने संतप्त व्यावसायिक यांनी सदर बाब पत्रकार भगत यांना सांगितली असता सदर समस्ये संबंधित चर्चा करण्याकरिता महेंद्र भगत मुख्याधिकारी यांच्या कक्षात गेले असता मुख्याधिकारी यांनी आयडी कार्ड हिसकावत अभद्र वागणूक दिली. त्यामुळे सपुर्ण दिवसभर नगरपरीषद कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अशा मग्रुर आणि मुजोर मुख्याधिकाऱ्या विरोधात कारवाईची मागणी होत आहे.














Add Comment