प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे
समता सैनिक दल नागपूर यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातारगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून शाखेची स्थापना सुद्धा करण्यात आले आहे. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला प्रमुख पाहुण्याचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी रमेश पाटील उदखेड, समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर जिल्हा अमरावती च्या उपप्रमुख सैनिक लताताई रमेश पाटील, तालुका प्रमुख रामेश्वर गडलिंग प्रामुख्याने उपस्थीत होते.
समता सैनिक दल ता. नांदगाव चे प्रमुख सैनिक रामेश्वर गडलिंग यांनी भारतीय संविधान प्रास्तावीकेचे वाचन करून समता सैनिक दल शाखा सातरगाव च्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. तसेच अमरावती जिल्ह्याच्या उपप्रमुख सैनिक लताताई रमेश पाटील यांच्या हस्ते समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर सातरगाव च्या बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनावर आधारित रामेश्वर गडलिंग यांनी आपले विचार व्यक्त केले. वाकपुर दादापुर च्या शाखा उपप्रमुख सारीकाताई अनिलराव सोनोने यांनी सर्व सैनिकांना दलाची प्रतिज्ञा दिली.














Add Comment