‘एचटीबीटी’ बियाण्यांची तस्करी जोरात; परराज्यांचे कनेक्शन उघड…
प्रतिनिधी | धामणगाव रेल्वे –
राज्यात कपाशीच्या ‘एचटीबीटी’ (हर्बिसाईड टॉलरंट बीटी) बियाण्यांची बेकायदेशीर तस्करी झपाट्याने वाढत असून, या तस्करीमागे गुजरात व मध्य प्रदेशातील टोळ्यांचे कनेक्शन स्पष्टपणे उघड झाले आहे. यंदा केवळ ३ जून २०२५ पर्यंत राज्यात तब्बल ३७ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेषतः नाशिक विभागाने सुमारे ५६ लाख रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त करून कठोर कारवाई केली आहे.














Add Comment