अमरावती सामाजिक

विविध सामाजिक उपक्रम राबवून अमरावतीत दयावान सरकारचे संदीप निकुंभ यांचा वाढदिवस साजरा

अमरावती प्रतिनिधी

 

घर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संदीप निकुंभ यांचा वाढदिवस अमरावती येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भिम टेकडी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुंबईचे किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दयावान सरकारचे संदीप निकुंभ यांनी वाढदिवसानिमित्त अमरावतीतील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध व्हावी यासाठी स्वतः चार एकर जमीन विकत घेऊन त्यांना घरे बांधून देण्याची संकल्पना केली आहे. त्यानिमित्त ठीक ५ वाजता भिम टेकडी परिसरात अमरावती येथे भव्य जाहीर सत्कार करण्यात आला आहे. तसेच गरीब कुटुंबातील मुलं मुली दहावी वर्गामध्ये ९२ टक्केवारी घेऊन चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आहे. तसेच गरीब कुटुंबातील ३० महिलांना एमआयडीसी येथे रोजगार सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याने दयावान सरकारचे उपस्थित नागरिकांनी आभार मानले.
सामाजिक कार्यक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या, गोरगरिबांच्या मदतीला सदैव तत्पर असणाऱ्या या दयावान सरकारचे अध्यक्ष संदीप निकुंभ याना अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस अमरावतीकरानी साजरा केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वंचित बहुजन युवा आघाडी चे अमरावती शहरअध्यक्ष रुग्णसेवक सुरेश तायडे, साहेबराव भगत, प्रभू तायडे, सुरेंद्र खडसे, सुरेश गुडदे, दिलीप पडघम, मंगेश जामनिक, राजेश तायडे, अनिल गडलिंग, भारत मेश्राम, विद्या तायडे, सुनील गायकवाड, सागर पाचोडे, माधुरी बनसोड, जया हुमणे, जया भगत, शीला भगत, वैष्णवी भगत, लता थोरात, पुष्प लता बोरकर, रुपेश खंडारे, प्रवीण खंडारे, चाकू मेश्राम , दौंडे, वानखडे, तसेच अमरावतीतील हजारो नागरिक व दयावान सरकार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भीम टेकडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!