धामणगाव रेल्वे

शंकर पटातील आयोजकांच्या ढिसाड नियोजनामुळे बैलगाडा शर्यंत चक्क दोन तास बंद

जनतेच्या सुविधेपेक्षा आर्थिक बाबीकडे आयोजकांचे लक्ष ?

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील तळेगाव दशासर येथील जंगी शंकर पट व यात्रा महोत्सवाचे पंचक्रोशीत नावलौकिक आहे. मात्र या वर्षी उदघाटनाच्या दिवशीच आयोजकांच्या ढिसाड नियोजनामुळे चक्क दोन तास बैलगाडा शर्यंत बंद होती. त्याचे कारण असे कि, आयोजकांच्या अर्थकारणामुळे पटात लागणारी दुकाने धावपट्टीच्या जाळी जवळ लागल्याने पोलिसांना सदर दुकाने हटवावी लागली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मागील अनेक वर्षात उद्घाटनापासून चार ते पाच दिवस येथे हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. येथील परिसरात लागणारी शेकडो दुकाने कृषक सुधार मंडळाकडून प्लॉट पाडून नियोजित वेळेसाठी विकली जातात. दरम्यान गुरुवारी (ता.१५) उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी शंकर पटातील धाव पट्टीच्या कडेला असलेल्या जाळी (बॅरिगेट) जवळ सुद्धा आयोजकांनी दुकाने थाटण्यास परवानगी दिल्याने बॅरिगेट जाळी जवळचा रस्त्यावर बघ्यांची तुफान गर्दी झाली होती. धावपट्टीच्या अवती-भवती बैलगाडा शर्यत बघ्यांची गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीचा संभाव्य धोका लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाने तळेगाव दशासर पोलिसांकडून सदरची दुकाने हटविण्यात आली. मात्र यावेळी आपल्या आर्थिक नियोजनात अडथडा येऊ नये यासाठी कृषक सुधार मंडळाने तळेगाव दशासर पोलिसांचा विरोध दर्शविला. आणि पोलिसांच्या असहकार्यामुळे पट बंद करण्यात येत असल्याची थेट भोंग्यात घोषणाच केली व जवळपास दोन तास बैलगाडा शर्यत बंद ठेवण्यात आली. दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आमदार प्रताप अडसड व धामणगाव नगराध्यक्षा अर्चना (अक्का) रोठे यांच्या सामंजस्यातून काही वेळाने शर्यत पुन्हा सुरू करण्यात आली.
आपला आर्थिक फायदा जोपासण्यासाठी जनतेच्या सुविधेकडे लक्ष न देता आयोजकांनी नको त्या जागेवर दुकाने थाटण्याची परवानगी दिली, परंतु संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीला पोलीस सहकार्य करीत नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तळेगाव दशासर येथील हिंद केसरी शंकर पटाला शतकोत्तर परंपरा लाभली आहे. परंतु या स्पर्धेचे आयोजक कृषक सुधार मंडळाकडून शंकर पट व यात्रा महोत्सवात शेतकरी, पट शौकिन व यात्रेकरू नागरिकांना नव्हे तर दुकानदार वर्गाला जास्त महत्व दिल्या जात असल्याचे दिसून येत असून सदर घटनेत कृषक सुधार मंडळाचे अर्थकारण दडले असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

पट व यात्रेत चार दिवसात असंख्य नागरिक येतात. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाने धावपट्टीच्या आजू – बाजूची जागा मोकळी करून घेतली- किरण औटे, ठाणेदार, तळेगाव दशासर

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!