धामणगाव ( रे ) – प्रतिनिधी
परभणी येथील संविधानाची विटंबना प्रकरणी निघालेल्या मोर्चात संविधान रक्षणासाठी आंदोलनात सहभागी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील संविधान प्रेमी आंबेडकर जनतेने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
तसेच वच्छलाबाई मानवते यांना बेदम मारहाण केल्याचे पडसाद महाराष्ट्रसह संसदेतही उमटत आहे. सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूचे सत्य सामोर यावे तसेच जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व संविधानाची विटंबना करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासारख्या विविध मागण्यांसाठी धामणगाव तालुक्यातील संविधान प्रेमी व आंबेडकर जनता मोठ्या संख्येने निषेध मोर्चात सहभागी झाली होती.
Add Comment