धामणगाव रेल्वे
मागील ५ दिवसापासून शेतकरी कर्जमाफी सह अन्य १७ मागण्यासाठी माजी राज्य मंत्री, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. विविध संघटनेचा, आमदार खासदारांचा सदरच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत असताना ५ दिवस उलटूनही या निगरगट्ट प्रशासनाने आंदोलनकर्त्याची दखल घेतली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बच्चू कडू च्या समर्थनात आंदालन सुरु आहे. तर बच्चूकडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याने कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलनाची तीव्रता वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण येत असल्याचे चित्र आपल्यासमोर आहे.














Add Comment