धामणगाव रेल्वे

दलित वस्तीमधील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे न पाडण्यासाठी उपसरपंचाकडून ५ हजाराची लाच देण्याचा प्रयत्न ?

ग्रामपंचायत अंजनसिंगी येथील उपसरपंचाचा प्रताप ; वायरल रेकॉर्डिंग ने उडाली खळबळ

धामणगाव रेल्वे –

   अंजनसिंगी येथील ग्रामपंचायत कडून विकामकामे केली गेली असून त्यात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी केला होता. तर झालेल्या कामात कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला हे प्रत्यक्ष व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर दाखवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सरपंच, सचिव व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबतची मागणी केली होती.
सदर प्रकरणाचा व्हिडीओ वायरल होताच ग्रामपंचायत प्रशासन खळबळून जागे झाले असून प्रकरण दाबण्यासाठी त्यांचा हालचाली वाढल्याचे चित्र निर्माण झाले असून चक्क उपसरपंच अवधूत दिवे यांच्याकडून तक्रारदार कपिल पडघान याना फोन करून भ्रष्टाचार उघड न करण्यासाठी ५ हजार रुपये देतो. आपल्या गावाची बदमानी होते म्हणून लाच देण्याचा प्रयत्न केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग कपिल पडघान यांनी पुन्हा सोशल मीडियावर वायरल केली असून सदरच्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस तक्रार करणार असल्याचे कपिल पडघान यांनी सांगितले.

अवधूत दिवे आणि कपिल पडघान यांची वायरल ऑडिओ रेकॉर्डिंग ची जनसूर्या न्यूज पृष्टि करीत नाही

आज सकाळी कपिल पडघान यांनी ग्रामपंचायत अंजनसिंगी येथील उघड केलेल्या दलित वस्तीमधील भष्टाचार प्रकरणी ग्रामपंचायत मधील उपसरपंच यांनी ५ हजाराचे आमिष दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून पैसे घेण्यासाठी कपिल पडघान यांनी स्पष्ट नकार दिल्याचे दिसून येत आहे. तर कपिल पडघान आणि उपसरपंच त्यांच्यात झालेले संभाषण मोठ्या प्रमाणात वायरल झाले असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!