अमरावती सामाजिक

अमरावतीत प्रथमच राज्यस्तरीय १००० उपवधू – वर परिचय मेळावा आयोजित

प्रज्ञावंत वधु – वर सुचक केंद्र व आवाज इंडिया टीव्ही च्या वतीने ६ एप्रिल २०२५ रोजी मेळाव्याचे आयोजन

अमरावती – प्रतिनिधी

अमरावतीच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय १००० उपवधू – वर मेळाव्याचे धम्मशांती विपश्यना सेंटर व पर्यटन स्थळ.आडगाव (खुर्द) बेलोरा विमानतळा जवळ अमरावती येथे करण्यात आलेला आहे. या सुवर्णसंधीचा फायदा उप वधू-वरांनी घ्यावा असे आवाहन आवाज इंडिया टीव्ही चे प्रमुख कैलास मोरे यांनी केले आहे. या मेळाव्यात ( डॉक्टर, इंजिनियर, वकील ,शासकीय, निमशासकीय, उद्योजक, शेतकरी, विधवा, घटस्फोट, आंतरजातीय सुद्धा परिचय मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.)

प्रज्ञावंत वधु – वर सुचक केंद्र व आवाज इंडिया टीव्ही च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय १००० वधू- वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून उप वधू- वर या ठिकाणी येणार आहेत तसेच गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड या ठिकाणाहून सुद्धा वर वधू येणार आहेत धम्मशांती विपश्यना सेंटर येथे सर्व सुविधा उपलब्ध असून त्या ठिकाणी मेळावा घेण्यात आला आहे. वधू वर परिचय मेळावे घेणे ही काळाची गरज आहे. व्यस्त जीवनात मुला-मुलींच्या आई-वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी असते. त्यातच चांगले स्थळ मिळावी ही सर्वांची इच्छा असते. परिचय मेळाव्यात प्रत्यक्षरित्या मुला-मुलींना बघता येते जेणेकरून लवकरात लवकर लग्न जुळेतील त्याकरिता वेळेची बचत होते एकाच मंचावर शेकडो मुल, मुली उपस्थित राहतात त्यातूनच प्रत्यक्षरीत्या आपणास जीवन साथी निवळ करण्यात मदत होते. हे सामाजिक महान कार्य आहे. त्याकरिता प्रज्ञावंत वधु – वर सूचक केंद्र अमरावतीच्या वतीने हे कार्य हाती घेण्यात आलेले आहे.
यात ज्या लोकांनी नावाची नोंदणी केली त्यांनाच यात सहभागी घेता येईल सोबतच वर वधूचे आई-वडिलांनाच प्रवेश दिला जाईल. बाकी कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. याची नोंद घ्यावी परिचय मेळाव्यात येणारे आई-वडील व वर वधू यांची भोजनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. तरी या मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून घ्यावी अशी विनंती आयोजनकर्त्याकडून करण्यात आली आहे. तरअधिक माहितीकरिता मुख्य आयोजक कैलास मोरे मो. न. ८००७३१३४३७, बी आर धाकडे ९५०३५५१०८६ यांच्याशी संपर्क करू शकता.
सदरच्या कार्यक्रमासाठी किशोर सरदार, नाजूकराव ठोके, सुभेदार अविनाश गायकवाड, दीपक सवाई, सुखदेवराव ढोके, मंगेश डोंगरे, विशाल गवई, उमेश मेश्राम, सुभाष गडलीग, रुपेश भिवगडे, राजेंद्र नितनवरे, विजय कांबळे, योगेश घोगरे, कपिल धवणे धनंजय गुडदेकर, सतीश नाईक, सिद्धार्थ शेंडे, साहिल नवाळे, एम एम खंडारे, पंकज धर्माजी वंजारी, प्रशांत तायडे, नामदेवराव वासनीक, प्रकाश ढोने, उदयभान गजभिये, शफी भाई सौदागर, राजेश अंभोरे, बंडूभाऊ चोटपगार, राजकुमार वरघट, कांचनताई आडोळे, प्रतिभाताई वानखडे, आशाताई मेश्राम, सुनिताताई नागदिवे, सुशीलाताई नागदिवे, मायाताई मेश्राम, मंदाकिनीताई बागडे, सरला ताई इंगळे, मनीषाताई काळे, दमयंतीताई मुंद्रे, सारिका मेश्राम, कल्पना बनकर, बेबीताई मोहड, प्रेमाताई सोनटक्के, कुंदाताई डांगे, अनिताताई जंजाळ, अधिकाधिक परिश्रम घेत आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!