अमरावती

अमरावती परिक्षेत्रातील पो. नि. सह पो. उप. निरक्षक अशा ६३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अमरावती – प्रतिनिधी

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी परिक्षेत्रातील बदलीपात्र ६३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये १८ पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक व ३१ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
अमरावती शहर आयुक्तालयात पाच वर्षे कर्तव्य बजावलेले पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांची वर्षभरापूर्वी यवतमाळमध्ये बदली झाली होती. आता ते अमरावती ग्रामीण दलात बदलीवर येणार आहेत, तर अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे यांची यवतमाळ येथे बदली झाली आहे. वाशीममध्ये कार्यरत पोलिस निरीक्षक आनंद वागतकर व भूषण गावंडे यांची यवतमाळ व बुलढाणा, बुलडाण्यात कार्यरत प्रवीण नाचनकर व शिरीष खंडारे हे अनुक्रमे वाशीम व अकोला येथे बदलून गेले आहेत.
अकोला येथे कार्यरत जयवंत सातव यांची बुलडाण्यात बदली करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत धनराज निळे, सीताराम मेहत्रे व राहुल आठवले यांची अनुक्रमे वाशीम, बुलडाणा व अमरावतीग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे. बुलडाण्यात कार्यरत दीपक कोळी व वाशीम जिल्ह्यात कार्यरत पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांची अकोला घटकात बदली करण्यात आली आहे.

१४ एपीआयच्याही बदल्या

अमरावती परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये कार्यरत १४ सहायक पोलिस निरीक्षकांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत राहुल जंजाळ, विजयमाला रिडे, पुष्पलता वाघ व शिवदर्शन बिरादार यांची बदली अनुक्रमे अकोला, यवतमाळ, अकोला व यवतमाळ येथे झाली आहे. यवतमाळ येथे कार्यरत सूरज तेलगोटे व वर्षा खरसान हे अमरावती ग्रामीणमध्ये परतले आहेत. गणेश खराडे यांची बुलडाण्यात बदली करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात कार्यरत ईश्वर वर्गे, गीता तांगडे, मिलिंद पारडकर व जगदीश बांगर यांची बदली अनुक्रमे अमरावती ग्रामीण, अकोला, यवतमाळ व वाशीम येथे झाली आहे. तर वाशीम येथे कार्यरत पवन राठोड व अमोल पुरी यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!