धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक- १५ एप्रिल २०२५ ला धामणगाव रेल्वे तालुका मुख्याध्यापक संघ यांच्याद्वारे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष – धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. रमेशचंद्र चांडक तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार . प्रताप अडसड तसेच प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे, अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव गजानन मानकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वेच्या सपनाताई भोगावकर, धामणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद देशमुख, से.फ.ला.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते..
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती आमदार प्रतापदादा अडसड तसेच या कार्यक्रमाचे सेवानिवृत्त सत्कारमूर्ती से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणेश चांडक, कान्होजीबाबा विद्यालय, अंजनसिंगीचे माजी प्राचार्य भाऊराव गाढवे, साईबाबा विद्यालय, अंजनसिंगीचे माजी मुख्याध्यापक प्रकाश दातार.. यांचा उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शालश्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार सोहळा पार पडला..














Add Comment