अपघात धामणगाव रेल्वे

अपघात घडला अन… ज्वलनशील पदार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचे फुटले बिंग

तळेगाव द. पोलिसांकडून ८०० लिटर पेट्रोलसह वाहन जप्त ; २ आरोपी अटकेत

धामणगाव रेल्वे – सुरज वानखडे

समृध्दी महामार्गावर मुंबईकडे जाणारे कॉरीडॉर वर चैनल क्रमांक १२९ चे बाजुला मोकळया जागेमध्ये असलेल्या ज्वलनशिल पदार्थ पेट्रोल वर केलेल्या कारवाईत तळेगाव दशासर पोलिसांनी ८०० लिटर पेट्रोल सह वाहन क्रमांक एम एच ३० बी डब्लू ४९५० जप्त केले असून नमूद दोन आरोपीविरुद्ध गुन्हया दाखल केला आहे.
दि. २० जानेवारी रोजी समृद्ध महामार्गालगत ग्राम किरजवळा ता. चांदूर रेल्वे येथील शेतशिवारामध्ये खुल्या जागेत ज्वलनशील पदार्थ पेट्रोल पडून असल्याची माहिती तळेगाव द. पोलीस प्रशासनाला मिळताच ठाणेदार किरण औटे यांनी तत्काळ स्वतः पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना होवुन सदर ठिकाणी ३५ लिटर आकाराचे कॅना मध्ये अंदाजे ८०० लिटर पेट्रोल भरलेले आढळून आले तसेच काही कॅनचे फुटलेल्या तसेच काहीचे झाकण निघुन त्यातुन पेट्रोल सांडत असल्याचे दिसून आले. सदर अज्ञात आरोपीने पेट्रोल या अति ज्वलनशिल पदार्थ बेजबाबदार पणे उघडयावर टाकुन स्वतःची तसेच समृध्दीवर जाणारे प्रवाशांची व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणल्याने पोलीसांनी तातडीने पंचनामा करुन पेट्रोलच्या कॅन ताब्यात घेतल्या तसेच सदर ठिकाणी वाहन क्रमांक वाहन क्रमांक एम एच ३० बी डब्लू ४९५० याची नंबर प्लेट मिळुन आल्याने तांत्रीक तपासा आधारे सदर वाहनाचे मालकाचा तातडीने शोध घेवुन बाहन मालक ओम श्रीकृष्ण लासुरकार बय २३ वर्षे रा. सस्ती ता पातुर जि अकोला व त्याचा मित्र अभिजित माधव राउत वय २८ वर्षे रा जठारपेठ अकोला यांना बेलोरा विमानतळाजवळून ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी यांनी पुलगाव येथील अनोळखी ट्रक चालक यांचे कडुन कमी भावात खरेदी करुन पातुर येथे अधिक भावात विक्री करण्यासाठी समृध्दी महामार्गाने जात असतांना वाहनाचा अपघात होवुन वाहन पलटी झाल्याने पेट्रोलने भरलेल्या कॅन सदर ठिकाणी बेवारस ठेवुन वाहन घेवून निघुन गेल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे गुन्हयातील अशोक लेलैंड पिकअप वाहन क्रमांक वाहन क्रमांक एम एच ३० बी डब्लू ४९५० किमत अंदाजे ५ लक्ष व अंदाजे ८०० लिटर पेट्रोल किमत अंदाजे ८४ हजार असा एकूण ५ लक्ष ८४ हजाराचा मुददेमाल पोलीसांनी जप्त केलेला आहे. सदर प्रकरणी जप्त पुरवठा विभागाचे तपासणी नतंर डॉ. २२ जानेवारी २६ रोजी पो. स्टे. तळेगाव दशासर येथे आरोपी विरुध्द कलम २८७, १२५ भारतीय न्याय संहीता २०२३ व कलम ३ , ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अमरावती ग्रा जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे, जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे आदेशाने व मार्गदर्शानात पो स्टे तळेगाव दशासर येथील ठाणेदार स.पो.नि किरण औटे, पो.हे.कों रमेश दाते, विनोद राठोड, पो. शिपाई यशवंत काळे, चालक पो. शिपाई सागर गवळी यांनी केलेली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!