धामणगाव रेल्वे शैक्षणिक

आयआयटी बॉम्बे येथून अभिषेक चनेकार यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी

आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाची दखल

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी 

धामणगाव रेल्वे तालुक्याचे सुपुत्र तथा बेंबळा प्रकल्पातील सेवानिवृत्त उपअभियंता (डेप्युटी इंजिनिअर) अरविंद चनेकार यांचे चिरंजीव अभिषेक अरविंद चनेकार यांनी देशातील नामांकित भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering) मध्ये पीएचडी (Doctor of Philosophy) पदवी प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अभिषेक चनेकार यांनी “Active Thermal Control of Power Semiconductor Devices” या अत्याधुनिक व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर संशोधन पूर्ण केले. पॉवर सेमिकंडक्टर उपकरणांमधील तापमान (Thermal) व्यवस्थापन सुधारून त्यांची कार्यक्षमता, सुरक्षितता व आयुष्य वाढवणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. या संशोधनाचा उपयोग पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक वाहने (EV), तसेच नवीकरणीय ऊर्जा प्रणाली यामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
या संशोधनासाठी अभिषेक यांना आयआयटी बॉम्बेच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. संदीप आनंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी आपला पीएचडी संशोधन प्रबंध १८ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या सादर (डिफेन्स) केला. अभिषेक चनेकार यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, त्यांनी बेल्जियम, डेन्मार्क (युरोप) तसेच अमेरिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन पेपर प्रकाशित व सादर केले आहेत. त्यामुळे त्यांचे संशोधन जागतिक विद्यापीठे व उद्योग क्षेत्रात पोहोचले आहे.
            या यशामागे आई सुनिता चनेकार, वडील अरविंद चनेकार, बहीण राधिका व जावई, तसेच मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अभिषेक यांच्या या यशामुळे चनेकार कुटुंबासह संपूर्ण परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 “माझ्या शैक्षणिक यशामागे माझे मार्गदर्शक प्रा. संदीप आनंद यांचे अमूल्य मार्गदर्शन तसेच आई-वडील, कुटुंबीय आणि मित्रांचे मोठे योगदान आहे. आयआयटी बॉम्बेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत संशोधन करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी गौरवाचे आहे. माझे संशोधन भविष्यात ऊर्जा व पॉवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे.” – अभिषेक चनेकार

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!