धामणगाव रेल्वे

धामणगावात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग ; गुन्हा दाखल

 

धामणगाव रेल्वे

हिराबाई गोयनका कन्या विद्यायाल येथे इय्यता ७ वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा शाळा सुटल्यानंतर घरी परत जात असताना विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना दि. २९ जुलै रोजी उघडकीस आली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दत्तापुर पोलिसांनी आरोपी सोनू दिगंबर मडामे वय -३४ वर्ष रा. रमाबाई आंबेडकर नगर धामणगाव रेल्वे याच्या विरुद्ध पॉक्सो कलम १२, ८ , बीएनएस ७४, ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळकरी मुलगी सकाळची शाळा सुटल्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत घरी परत जात असताना रेल्वे फाटक बंद असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. फाटक उघडल्यानंतर गर्दी कमी होण्याची वाट बघत असताना दुपारी १२:३० च्या दरम्यान तिथे आरोपी आला व त्याने फिर्यादी शाळकरी मुलीची छाती दाबली आणि चहा कँटीन च्या बाजूला झाडाजवळ उभा राहून हाताने इशारे करून बोलावत होता. सदरचा प्रकार घडल्यानंतर दोन्ही मुली घाबरल्या असताना फिर्यादीच्या मैत्रिणीने एका व्यक्तीच्या मोबाईल वरून फिर्यादीच्या आईला सर्व माहिती दिली. थोड्यावेळाने तिचे वडील घटनास्थळावर आले असता आरोपी तेथून पसार झाला. त्यामुळे फिर्यादी आपल्या वडिलांसोबत दत्तापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

पुढील तपास ठाणेदार गजानन मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनात दत्तापूर पोलीस करीत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!