धामणगाव रेल्वे

धामणगाव रेल्वे प. स. विस्तार अधिकारी निलेश वाघ यांना निलंबित करा – सुरज गंथडे

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या व्हायरल चॅट प्रकरणात प्रहारची उडी !

धामणगाव रेल्वे

मध्यंतरी काळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानंतर्गत धामणगाव तालुक्यातील समाविष्ट असलेल्या १२ ग्रामपंचायतींपैकी हिंगणगाव, कावली, ढाकुलगाव, कामनापूर, घुसडी आणि पिंपळखुटा या ग्रामपंचायतीच्या गुणांची यादी आधीच ठरवून व्यवस्थित ठेवावी. इतर ग्रामपंचायतीला २० ते ३० गुणांच्या वर देण्यात येऊ नये. तसे झाल्यास तपासणी समिती आपल्या गावात येईल याची जबाबदारी हि आपली असेल. हि सर्व चर्चा माझी वाघ सर सोबत झाली आहे अशा प्रकारचे मेसेज ओन्ली ग्रामपंचायत अधिकारी धा. रे वर ग्रामविकास अधिकारी राहुल धोटे यांच्याकडून टाकण्यात आला होता. सदरचा मेसेज व्हायरल झाल्याने ग्रामविकास अधिकारी तथा प. स. विस्तार अधिकारी यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र सदर व्हायरल मेसेज संदर्भात ग्रामविकास अधिकारी राहुल धोटे यांना विचारपूस केली असता तो मेसेज विस्तार अधिकारी यांनी स्वतः माझा मोबाईल घेऊन ग्रुप वर टाकला असल्याचे सांगितले.

प.स. विस्तार अधिकारी निलेश वाघ यांची सखोल चौकशी करून निलंबित करण्याची मागणी

सदरच्या व्हायरल चॅट मध्ये विस्तार अधिकाऱ्याच्या दबावामुळे एका ग्रामविकास अधिकाऱ्याचा बळी जात असल्याचे निदर्शनास येताच सदर प्रकरणात प्रहार पक्षाने उडी घेतली असून प्रहारचे तालुकाप्रमुख सुरज गंथडे यांनी धामणगाव तालुक्यातील हिंगणगाव, कावली, ढाकुलगाव, कामनापूर, घुसडी आणि पिंपळखुटा या ५ ग्रा. प. सोडून इतर ग्रा. प. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानापासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत प्रशासनाला १३ जुलै रोजी निवेदन देत थेट प. स. विस्तार अधिकारी निलेश वाघ यांची सखोल चौकशी करून त्यांचे निलंबन करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अमरावती यांच्याकडे केली आहे. निवेदनावर कार्यवाही न झाल्यास अन्यायग्रस्त प्रशासक, ( सरपंच ) सदस्य व नागरिकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधानपरिषद आमदार बच्चू कडू, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अमरावती, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती, गटविकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांना देण्यात आल्या आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!