धामणगाव रेल्वे

पांदण रस्त्याच्या प्रश्नावर सुरज गंथळे आणि तहसीलदार अभय घोरपडे यांच्यात “शाब्दिक प्रहार”

तीन तास कार्यालयात ठिय्या, बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने तोडगा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास मागे

धामणगाव रेल्वे –

३ वर्षा अगोदर मोठया उत्साहात आमदाराच्या हस्ते तालुक्यातील २७५ पांदण रस्त्याचे उदघाटन झाले. मात्र २०२६ हे अर्ध वर्ष संपुष्ठात आले असताना देखील बोटावर मोजण्याइतके १५ ते २० पांदण रस्ते पूर्णत्वास आले असून उर्वरित काम अद्यापही सुरु न झाल्याची सद्यस्थिती तालुक्यात आहे. त्यामुळे काही दिवसांवरच पावसाळा आलेला असताना देखील तहसील प्रशासन आपल्यातच मग्न असल्यामुळे प्रहारचे तालुका प्रमुख सुरज गंथळे यांनी त्या प्रश्नावर यापूर्वी तहसीलदार याना निवेदन देऊन संबंधित ठेकेदावर कार्यवाही करण्याची मागणी केली होती तसेच पांदण रस्त्याचे कामे न झाल्यास आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु तहसील प्रशासनाकडून कोणतीही ठोस पाऊले न उचलल्याने आज रोजी सकाळी ११ वाजता पासून तहसील कार्यालयात अनेक शेतकरी बांधवांच्या उपस्थित सुरज गंथळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरु झाले.

कंत्राटदार-प्रशासनाच्या युतीवर ‘प्रहार’चा हल्लाबोल

स्थानिक प्रशासनाचा मनमानी कारभार आणि कंत्राटदारांच्या संगनमताने शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक याविरोधात आज धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाने वादळी ठिय्या आंदोलन केले. प्रहारच्या या ‘धडक’ आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. अखेर, कोंडीत सापडलेल्या तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

ठिय्या आंदोलन दरम्यान सुरज गंथळे आणि तहसीलदार अभय घोरपडे यांच्यात तू तू मै मै

तालुक्यात पांदण रस्त्याबाबत अतिशय दयनीय अवस्था असतानाही प्रशासनाकडून ठोस पाऊले न उचलल्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी हाल अपेष्ठा सहन कराव्या लागणार असल्याचे चित्र दिसत असताना तहसील कार्यलयात ठिय्या आंदोलन दरम्यान सुरज गंथळे आणि तहसील अभय घोरपडे यांच्या शाब्दिक तू तू मै मै झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. २७५ पैकी १८० पांदण रस्त्याचे काम तुमच्याच पक्षाच्या ठेकेदाराने घेतले असे शब्द अभय घोपरडे यांच्या तोंडून निघताच सुरज गंथडे यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देत. तो ठेकेदार कोण ? पक्ष पाहून ठेकेदारी देता का? उर्वरित पांदण रस्त्याचे ठेके सुद्दा एकाच ठेकेदाराला दिले का? इत्तर पक्षाचे दलाल जवळ बसून तुम्ही त्यांचे कामे करता त्यांचे काय ? पक्षाचे चाटूगिरी करणाऱ्या लोकांचे, रेती, मुरूम माफियांचे काम तुम्ही करता सामान्य जनतेचे एकही काम तुमच्याकडून होत नाही अशा शब्दात तहसीलदाराला खडेबोल सुनावले.

तहसील कार्यालयात आंदोलनकर्त्याला पाण्याचीही सोय नाही, शेतकऱ्यांनी वर्गणी करून बोलावल्या पाण्याच्या कॅन

तहसील कार्यालयात तब्बल तीन तास चाललेल्या ठिय्या आंदोलनातील शेतकऱ्यांना साधी पाण्याचीही सोय तहसील प्रशासनाकडून करण्यात आली नाही. दरम्यान उपस्थित आंदोलनकर्ते शेतकरी सह पत्रकार यांनी वर्गणी करून पाण्याची सोय स्वतः उपलब्ध करून घेतली. त्यामुळे तालुक्याची एवढी मोठी प्रशासन व्यवस्था असतानाही साधे पाणी सुद्धा येणाऱ्या शेतकऱ्यांना उपस्थित होत नसल्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ठिय्या आंदोलन दरम्यान बच्चू कडू यांची मध्यस्थीने निघाला तोडगा

सकाळी ११ वाजतापासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात असंख्य शेतकरी सह सुरज गंथळे यांनी तहसील प्रशासनाचा घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. तसेच तहसीलदार अभय घोरपडे आणि सुरज गंथाडे यांच्यात झालेली शाब्दिक चकमक पाहता तहसीलदार यांनी आपली खुर्ची सोडली त्याच दरम्यान आमदार बच्चू कडू यांचा फोन त्याठिकाणी आला असून त्यांच्या मध्यस्थीने आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. तालुक्यातील संपूर्ण पांदण रस्ते देण्यात आलेल्या १, एस ए बिल्डर्स २, श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन ३, श्रीकांत आर. काळे ४, ग्लोबल मायनिंग रोहन या चारही कंपनीच्या ठेकेदारांना ७ दिवसाचा अल्टिमेटम देत कामू सुरु करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे कामे सुरु न झाल्यास करारनामे रद्द करण्यात येऊन या उपविभागांतर्गत कुठेलेही कामे आपणाला करता येणार नसल्याचे पत्रात नमूद आहे.

​शेतकऱ्यांपुढे तहसीलदार व सार्वजनिक विभाग अधिकारी नमले

आंदोलनाचा वाढता आलेख आणि शेतकऱ्यांचा रोष पाहून पुन्हा तहसीलदार व सार्वजनिक विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. पांदण रस्त्यांची दुरावस्था तातडीने दूर करणे आणि कंत्राटदारांच्या मनमानीची चौकशी करण्याचे लेखी ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी देत प्रशासनाने नमते घेत घेतल्याने तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, “दिलेला शब्द पाळला नाही, तर यापुढचा लढा थेट मंत्रालयावर असेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल,” असा कडक आणि थेट इशारा तालुका प्रमुख सुरज गंथळे यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी ठिय्या आंदोलन दरम्यान दत्तापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!