धामणगाव रेल्वे

भरधाव चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना उडविले ? जुना धामणगाव पेट्रोलपंप जवळ अपघाताची घटना

जखमी दाम्पत्याला यवतमाळ हलविले तर, चारचाकी वाहन घटनस्थळावरून फरार

धामणगाव रेल्वे

जुना धामणगाव नजीक पेट्रोलपंप जवळ सियुवी कंपनीचे चारचाकी वाहन क्र. CG04CQ3300 ने भरधाव वेगाने चालवीत दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना आज दि. २९ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली आहे. अपघातग्रस्त जखमींना तात्काळ स्थानिक लोकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णायालात पाठविण्यात आले. त्यामध्ये एका दुचाकीवर विरूळ रोंघे येथील पिंटू सोनोने, अंदाजे वय ४५, पत्नी रुपाली सोनोने अंदाजे वय ३७ हे दाम्पत्य तसेच दुसऱ्या दुचाकीवरील गुंजी येथील वृद्ध व्यक्ती योगीराज निमकर अंदाजे वय ६० याना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. यांच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु असताना पिंटू सोनोने तसेच योगीराज निमकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान अपघातात चारचाकी सह दोन्ही दुचाकी यांची तूटफूट झाली असताना चारचाकी वाहनाचे चालक पुरुष असून त्यांच्यासोबतिला एक महिला असल्याची माहिती प्राप्त आहे. तसेच संधीचा फायदा घेत घटनास्थळावरून जखमींची भेट घेतो म्हणून निघालेली चारचाकी वाहन क्र. CG04CQ3300 ही ग्रामीण रुग्णालयात न पोहोचता मंगरूळ दस्तगीर बायपास ने पोबारा झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस चे कमर्चारी यांनी घटनास्थळी धाव घेत स्थळपंचनामा केला असून अधिकचा तपास सुरु आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!