धामणगाव रेल्वे

धामणगावात ​माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र तर्फे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर

नागरिकांमध्ये जणजागृती उद्धेशाने शेतकरी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन

धामणगाव रेल्वे

नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी ‘माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र’ यांच्या वतीने १८ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत शेतकरी भवन ( टीएमसी हॉल ) येथे विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शासनाचे महत्त्वाचे कायदे आणि कामगारांचे अधिकार यावर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य विषय व मार्गदर्शन: ​
१. दप्तर दिरंगाई कायदा २००५:
२. सेवा हमी कायदा २०१५ (RTS):
​३. संघटित कामगार सजक मार्गदर्शन:
​४. माहिती अधिकार कायदा २००५ (RTI): सरकारी कार्यालयातील कामकाजाची माहिती मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मकअधिकार आहे. अर्जाचा मसुदा कसा असावा, प्रथम व द्वितीय अपील करण्याची प्रक्रिया काय आहे, यावर या सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.
माहिती अधिकार कायद्याचे उद्दिष्टे (१) प्रगल्भ लोकशाहीसाठी माहिती गार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे. (२) नागरिकांचा प्रशासन कारभारातील सहभाग वाढवणे. (३) राज्यकारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणे. (४) शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे. (५) राज्यकारभारात व व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घलणे. (६) नागरिकांना माहिती मिळविण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने नागरिकांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
खरंतर हे कर्तव्य प्रशासनाचे आहे, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम २६ प्रमाणे शासनाने/समुचित शासनाने या प्रकारे कार्यक्रम घेऊन माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करणे, अधिकार वापर कसा करावा याचा यासाठी समाजातील विशेष अपेक्षित वर्गाचे प्रबोधन करण्याकरिता शैक्षणिक कार्यक्रम तयार करणे, सार्वजनिक प्राधिकरणाला कार्यक्रमास सहभागी होण्यास प्रोत्साहन देणे, सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या उपक्रमाविषयी अचूक माहिती योग्य वेळी प्रभावीपणे प्रसारित करणे, जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देणे व त्याकरिता लागणारे साधनसामग्री पुरविणे, या प्रकारे शासनाने जनजागृती करणे हे आवश्यक आहे. परंतु शासन याबाबत अंमलबजावणी करताना दिसत नाही.
प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे, जेव्हा नागरिक या कायद्यांचा वापर करतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल.” याकरिता माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निस्वार्थी मनाने विविध कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात घेण्यात येत असून नागरिकांचा समूह व त्यातील सजग नागरिक म्हणून त्यांचे हक्काची जाणीव करून देणे आणि प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, नागरिक सनद प्रमाणे नागरिकांचे कार्यालयातील काम पारदर्शकपणे पूर्ण करण्यास जनजागृती करणे हा आमचा मुख्य उद्देश माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा आहे.
त्याकरिता या शिबीराचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी १८ तारखेला शेतकरी भवन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन फेडरेशनचे संपर्क प्रमुख मनोज साफेकर, धीरज भैसारे यांनी नागरिकांना केले आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!