धक्कादायक धामणगाव रेल्वे

जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून घेतली फेरफाराची नोंद ?

धामणगाव तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार

धामणगाव रेल्वे 

तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे अंतर्गत एका गावातील जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून शेतीचा फेरफार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सदरील व्यक्ती जिवंत असूनही सन २०२० मध्ये त्या व्यक्तीला त्याच्याच नातेवाईकाने मय्यत दाखवून त्या शेतीचा फेरफार घेत वाटणीपत्र केल्याचा आरोप यावेळी तक्रारकर्त्याकडून करण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे येथील २०२० मधील नायब तहसीलदार यांच्या अधोरेखित मंडळ अधिकारी यांनी हा फेरफार घेतल्याचे समजते.
तक्रारकर्ता हे बाहेर गावी राहत असून त्यांना मुलं बाळ नसल्याने त्यांच्याच नातेवाईकाने हा सगळा प्रकार केल्याचे म्हणणे आहे तर ४ दिवसापूर्वी सदर प्रकरणाचे दस्तावेज मागितले असता ते प्रकरणच तहसीलकार्यालयामध्ये सापडत नसल्याची ओरड तक्रारकर्त्याकडून होत आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची पोलीस तक्रार करणार असल्याचे तक्रारकर्त्याकडून सांगण्यात आले.
सदरचे प्रकरण अतिशय धक्कादायक असून यामध्ये नातेवाईकांसह मय्यत चा दाखला देणारा पोलीस पाटील, तसेच फेरफार व वाटणीपत्र करून देणारे मंडळ अधिकारी तथा तत्कालीन नायब तहसीलदार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार दिसून येत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!