धामणगाव रेल्वे

जळका पटाचे ग्रा. प. चौकशीची बातमी प्रसारित होताच सरपंचाची तळफळाट

आमच्या बॉडीने भरपूर कामे केल्याचा सोशल मिडीयावर गवगवा

धामणगाव रेल्वे

ग्रा. प. जळका पटाचे गावातील नागरिकांनी सरपंचाविरोधात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची तक्रार करून त्या संदर्भात चौकशीची मागणी केली असता वरिष्ठाकडून पंचायत समितीला चौकशीचे आदेश प्राप्त झाले आहे. तर लवकरच ग्रामपंचायत च्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सदर विषयाची बातमी जनसूर्या न्यूज ने प्रकाशित करताच आपण केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती जनतेपुढे येणार म्हणून सरपंचाची तळफळाट सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहे.

एकंदरीत मी गावासाठी किती विकासकामे करून घेतली आणि किती कामे सुरु असल्याचा गवगवा काही व्हाट्सएप ग्रुप व सरपंच करीत आहे…. तर सांगण्याच्या ओघात सरपंचाकडून नागरिकांबाबत अतिशय असभ्य भाषेचा वापर करताना सरपंच दिसत आहे, जसे कि, कामाचा हिशोब मागण्याची त्यांची पात्रता नाही, त्यांच्या काळात कामे झाले नाही म्हणून त्यांना लाज वाटून राहिली अशा शब्दात नागरिकांचा अपमान करताना सरपंच दिसत आहे. सोशलमिडीया वर एक सरपंच म्हणून वावरताना नागरिकांप्रती असलेली असभ्य वर्तवणुकीची भावना हि गावात झालेल्या आमसभे मध्ये दिसून आली आहे.

यापूर्वी देखील ग्रा. प. मध्ये झालेल्या सभेत सरपंच हे प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना तुम्ही काही लीडर लागून नाही गेले अशा असभ्य भाषेचा वापर करतानाचा व्हिडीओ जनसूर्या न्यूज च्या हाती लागलेला आहे.

क्रमशः ….

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!