धामणगाव रेल्वे शासकीय

चना नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची तौबा गर्दी, पोलिसांना पाचारण

धामणगाव रेल्वे

दि. ०१ मार्च पासून धामणगावात ऑनलाइन चना नोंदणीला सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी नोंदणीकरिता शेतकऱ्यानी पहाटे ५ वाजतापासून रांग लावली असून शेतकी खरेदी विक्री सहकारी समिती परिसरात शेतकऱ्यांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान शेतकऱ्यांची झालेली झुंबड पाहता व्यवस्थापकांना पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर मात्र नोंदणी सुरळीत सुरु होती.
ऑनलाइन नोंदणी ही बायमेट्रिक ( बोटाचे ठसे घेऊन ) पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक होते. त्यामुळे शेतकऱ्यानी आज १. मार्च रविवार रोजी सकाळ पासून निर्धारित स्थळी येणे सुरू केले होते. नोंदणीसाठी शेतकऱ्यांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली, मात्र व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा न केल्याने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान आमचे सहकारी मित्र पत्रकार सलमान फैय्याज खान यांनी वास्तविकता जाणून घेत शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या विदर्भ टुडे न्युज च्या माध्यमातून प्रसारित करताच शेतकऱ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!