धामणगाव रेल्वे सामाजिक

सुनिल चोखोबाजी पाटील समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

हडपसर, पुणे येथे पार पडला समाजरत्न २०२५ वितरण सोहळा

धामणगाव रेल्वे 

दि. १९ फेब्रुवारी गुरुवार रोजी रतन नेपच्यून, हांडेवाडी रोड, हडपसर पुणे येथे दैनिक चालू वार्ता समाजरत्न पुरस्कार २०२५ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्य मधून ३१ जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे ७० पुरस्कार्थी हजर होते. सदरच्या समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय विष्णुपंत भोसले ( श्र्वेतदीप दास ) सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग, संचालक आत्रामृत फाउंडेशन, उपाध्यक्ष इस्कॉन, डायरेक्टर भक्ती वेदांत रिचार्ज सेंटर, महाराष्ट्र राज्य, प्रमुख पाहुणे सुनील रासने अध्यक्ष दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे, डॉक्टर भावार्थ देखने महाराज अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी पुणे, संदीप खर्डेकर भाजपा प्रवक्ते महाराष्ट्र राज्य, दौलत नाना शितोळे उपाध्यक्ष जय मल्हार आर्थिक महामंडळ महाराष्ट्र राज्य पुणे, संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती सेना संघटना महाराष्ट्र राज्य, ॲड काळूराम उर्फ रामभाऊ भुजबळ अध्यक्ष बार असोसिएशन पुणे, ही प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी धामणगाव रेल्वे येथील रामगाव या गावातील रहिवाशी निस्वार्थपणे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ता, दैनिक बाळकडू चे प्रतिनिधी, मिशन फॉर ह्युमन राईट धामणगाव रेल्वे, परतवाडा, मोर्शी तालुका इनचार्ज, स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन दैनिक चालू वार्ता व स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सुनिल चोखोबाजी पाटील यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डी. एस. लोखंडे पाटील संपादक दैनिक चालू वार्ता, अतुल नारायण तरवडे नगरसेवक पुणे मनपा, सौ. प्राची आशिष आल्हाट नगरसेवक पुणे मनपा, सुनील शिंदे संचालक स्वराज्य होम्स, बाळासाहेब बेनकर उपाध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!