धामणगाव रेल्वे प्रशासन

रामगाव येथील नालीचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे ?

नागरिकांची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील गट ग्रा. प. जळगाव आर्वी अंतर्गत रामगाव येथे नालीचे बांधकाम सुरु असून त्यात अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असल्याचे नागरिकांची ओरड आहे. रेती ऐवजी सर्रास डस्ट चा वापर, नित्कृष्ठ दर्जाचे सिमेंट ठेकेदार आपल्या मानमर्जीप्रमाणे टाकत असून सदरील नालीचे बांधकाम जास्त काळ टिकणारे नसून नागरिकांना परत त्याच समस्या उद्भवणार असल्याचे मत काही नागरिकांनी मांडले आहे. तर या संदर्भात सदरच्या कामाची तक्रार गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली असून त्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे… तक्रारीवर अजय तुपसुंदरे, मंगेश मडामे, सुनील पाटील, राहुल  बन्सोड सह इतर नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.

गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त होताच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रवीण आखरे यांनी नाली बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता डस्ट याऐवजी रेतीचा जास्त प्रमाणात वापर करून चांगल्या दर्जाची सिमेंट वापरण्याची सक्त ताकीद ठेकेदाराला दिली. त्यामुळे सध्यास्थित कामात सिमेंट मध्ये बदल करण्यात आले असून डस्ट चा वापर कमी करण्यात आला असल्याचे मत प्रवीण आखरे यांनी दिले असून सद्यस्थितीत योग्यप्रकारे काम सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच जेवढे काम झाले तेवढेच मोजमाप करून बिल काढण्यात येईल असा इशारा यावेळेस ठेकेदाराला देण्यात आला आहे.
तक्रारीवर अधिकारी यांनी पाहणी करून  कामात सुधारणा करण्यास सांगितले  असले तरी झालेल्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाचे काय? असा रास्त सवाल तक्रारकर्त्याकडुन करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!