क्राईम धामणगाव रेल्वे

दारूच्या नशेत झालेल्या हाणामारीत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची हत्या

विटाळा येथील वाईन बार जवळील घटना – ३ आरोपी अटकेत

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील विटाळा गावातील बियर बार जवळ शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दि. ०९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. अनिल सुखदेव आव्हाड वय ६८ वर्ष रा. रा. गुंजखेडा ता. देवळी जि. वर्धा असे मृतक व्यक्तीचे नाव असून अमोल विजय समरीत वय ३२, घनश्याम निंबरते वय ४०, संजय महादेव दिघोरे वय २७ सर्व रा. विटाळा, ता. धामणगाव रेल्वे असे आरोपी आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सह. पोलीस उपनिरीक्षक ठावरे मंगरूळ दस्तगीर हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यावेळी मृतकाचा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे पाठविण्यात आला .
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक व आरोपी यांच्यात मोबाईलच्या शुल्लक कारणावरून वाद झाला त्यामध्ये नमूद आरोपी यांनी मृतक यांच्या खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करून त्यांना भिंतीवर आपटून खाली ओट्यावर पाडले यामध्ये मृतकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. अशी तक्रार मृतक यांचे नातेवाईक अमोल किशोरराव आव्हाड वय ४० यांनी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन ला दिली असून तिन्ही आरोपी यांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०३ (१), ३ (५) खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मंगरूळ दस्त चे नवनियुक्त ठाणेदार अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. उपनिरीक्षक ठावरे, पो. हे.कॉ. राठोड, सतीश ठवकर सह मंगरूळ दस्तगीर पोलीस करत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!