धामणगाव रेल्वे सामाजिक

धामणगावात ७ फेब्रवारीला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव

विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित!

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानव जन्माच्या कल्याणासाठी, हक्कासाठी अर्पण केले, त्यांच्या या कार्यात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. त्या निम्मिताने येत्या ७ फेब्रुवारी रोजी म्हणजेच त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त्याने धामणगावात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम संविधान रक्षक जय संविधान सन्मान ग्रुपच्या वतीने स्व. दादारावजी अडसड व्हॉलीबॉल मैदान, भागचंद नगर, शास्त्री चौक धामणगाव रेल्वे येथे आयोजित करण्यात आले आहे.
ज्यामध्ये सायंकाळी ४ वाजता पासून कार्यक्रमाला सुरवात होणार असून भंत्ते डॉ. अभय बोधी यांच्या हस्ते बुद्ध वंदना व धम्म प्रवचन, त्यानंतर चालो बुध्द की ओर डान्स ग्रुप, त्यानंतर अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे अनुसूचित जातीवर झालेल्या अन्यायावर आयोगाची भूमिका, तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत भारतीय समाज यांच्यावर सुनील किटकर यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ पासून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार संविधान मनोहरे व दिपाली इंगळे यांचा बुद्ध भिम गिंताचा महासंग्राम चा दणदणीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदरचा कार्यक्रम संविधान रक्षक जय संविधान सन्मान ग्रुप धामणगाव रेल्वे अध्यक्ष प्रशांत मुन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन, समाजातील विविध सामाजिक संस्था व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी चा मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात येणारआहे. त्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी माता रमाई जयंती महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन रवि उर्फ दादू मेश्राम, प्रेम मोटघरे, सिध्दार्थ टाले, सदानंद कांबळे, भिमराव सहारे, अल्पेश बनसोड, राहुल भगत, आकाश मुन, इरफान अली, सेन्हल वानखडे, सीमा मुन, दिपाली जाधव, प्रनिता टाले, माधवी सावध, अरुणा भिल यांनी केले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!