धामणगाव रेल्वे शैक्षणिक

कलाशिक्षक अजय जिरापुरे यांच्या कलालेखणीतुन छत्रपती श्री संभाजीराजे याना मनाचा मुजरा

राज्याभिषेक दिनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर साकारले ” रौद्रशंभू “

धामणगाव रेल्वे

शहरातील सुप्रसिद्ध कला शिक्षक से.फ. ला हायस्कुल येथे कार्यरत अजय जिरापुरे हे नेहमीच आपला कलेतून सर्वसामान्याना आपलेसे करतात. आज दि. १६ जानेवारी छत्रपती श्री संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांनी आपला कलेतून विद्यालयाच्या दर्शनी फलकावर हुबेहूब ” रौद्रशंभू ” छत्रपती श्री संभाजीराजे यांचे चित्र रेखाटन केलेले आहे.

घोड्याच्या पाठीवर तुफान घेऊन ९ वर्ष जे वादळ सहयाद्रीने अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून भीमा, इंद्रायणी ही गहिवरल्या, ज्यांच्या डरकाळीने दिल्लीचे तख्तही हादरायचे अशा धाकल्या धन्याचा शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराजांचा दिनांक -१६ जानेवारी हा राज्याभिषेक दिन सोहळा.. छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली. खऱ्या अर्थाने शंभुराजांनी लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की श्री शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली.औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले..

राज्याभिषेक दिन सोहळा निमित्ताने कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी आपल्या कलेतून व्यक्तिचित्र साकार करून त्यांना मानाचा मुजरा केला आहे…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!