धामणगाव रेल्वे

अज्ञात चोरटयांनी लांबविले शेतातील साहित्य ; दत्तापूर पोलिसात गुन्हा दाखल

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी 

शहरालगत अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जळगाव आर्वी शेतशिवारातील शेतीपयोगी साहित्य अज्ञात चोरटयांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. १० जानेवारी ते १२ जानेवारीच्या दरम्यान सादर चोरीची घटना घडली असून ज्यामध्ये शेतकरी आदेश दिनेशराव भोगे शेत सर्वे न. १६० यांच्या शेतातील जुना वापरता ८० फूट केबल तर सुयोग सुनील भोगे शेत सर्वे न. ३ यांच्या शेतातील ३ पितळी स्पिंकलर अज्ञात चोरटयांनी लांबविल्याचे लक्ष्यात येताच शेतकरी आदेश भोगे यांनी दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून आज दि. १४ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

सातत्याने होत असलेल्या चोरीमुळे शेतकरी पूर्णपणे त्रासला आहे. एकीकडे नापिकीमुळे आधीच विवंचनेत असलेला शेतकरी त्यात वारंवार होत असलेल्या चोरीमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. त्यामुळे पोलीस प्राशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!