दिल्ली येथे राष्टीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बोधी बुडोकान च्या विद्यार्थ्यांचा बोलबाला
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ६ व्या राष्ट्रीय कराटे व १३ व्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील धामणगावच्या बोधी बुडोकान च्या खेळाळूनी आपले वर्चस्व गाजवीत धामणगावचे नाव उंचावले आहे. तब्बल २ सुवर्ण पदकासह १ सिल्वर पदकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे संपूर्ण धामणगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. एकीकडे नवीन वर्षाचा आनंद व्यक्त करीत असताना मुलांनी इंटरनॅशनल स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे २ सुवर्ण तर १ सिल्वर पदक आपल्या नावे करून धामणगावच्या खेडाळुनी दिल्लीतही आपला डंका वाजविला आहे. त्यामुळे द्विगुणित आनंदाचे वातावरण धामणगाव तालुक्यात आहे.
एनकेएफआई कराटे डो फेडरेशन ऑफ इंडिया ने केलेल्या आयोजित स्पर्धेत भारतातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राज्यस्थान, जयपूर, गुजरात जमू काश्मीर तर परदेशातुन उजबेकिस्तान, इरान, नेपाळ, जपान, या देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्यातील धामणगाव रेल्वे चे बोधी बुडोकान कराटे चे विदयार्थी कु. निर्मिती य. सयाम वय ६ वर्ष, वजन गट २२ हिने उजबेकिस्तान च्या कराटे खेळाडू चा पराभव करून सुवर्ण पदक पटकवले, तर रोहन रा. खोब्रागडे वय १२ वजन गट ३५ ते ४० मध्ये खेळून यांनी सुद्धा सुवर्ण पदक आपल्या नावे केले. तर क्रिष्णा सचिन चौधरी वय १२, वजन गट ३५ ते ४० या गटामधून सिल्वर पदकाला गवसणी घातली. तसेच कु. प्राची सूर्यादय हिला पार्टीसिपशन प्रमाण पत्र देण्यात आले. या खेडाळुनी आपल्या कामगिरीमुळे भारताचे नाव रोशन करून परदेशातही आपला डंका वाजविला आहे.














Add Comment