महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अल्पेश बनसोड व मित्र परिवार यांनी आयोजित केले होते तपासणी शिबीर
धामणगाव रेल्वे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ९ डिसेंबर रोजी रामगाव येथील बुद्ध विहारामध्ये नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे अल्पेश बनसोड व मित्र परिवाराने आयोजन केले होते.

यामध्ये जनरल फिजिशियन व सर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. स्वप्नील वाकेकर आणि त्वचारोग तज्ञ् डॉ. कोमल वाकेकर ( राऊत ) यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील ६८ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.














Add Comment