धामणगाव रेल्वे

धामणगाव येथे माहीती अधिकार कार्यकर्ता एक दिवसाचे शिबीर संप्पन्न

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, सुभाष बसवेकर यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्र्टात १०,००० पेक्षा जास्त माहीती अधिकार कार्यकर्त्याची टिम कार्यरत आहे. त्याचाच भाग म्हणुन पिंपरी चिंचवड, पुणे शहराध्यक्ष माननिय निलेश केवट यांनी ऐक दिवसाचे कार्यकर्ता शीबीरात मौल्यवान मार्गदर्शन धामणगाव रेल्वे येथे केले. RTI चा वापर व सहनशिलता ठेऊन कार्यकर्त्यांनी काम केले पाहीजे व आपण जनता हि देशाची मालक आहे व कलम ४ अंतर्गत माहीती व १ ते ३१ पर्यंत कलम ह्या कीती महत्वाच्या आहेत हे पटवुन दिले. या कायद्याचा दुर उपयोग होणार नाही याची सुध्दा कार्यकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एक सजग नागरीक व त्याचे अधिकार काय यावर निलेश भाऊ केवट यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अकोला येथिल ट्रेड युनियन कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा स्वतंत्र कृती समीती महाराष्र्ट चे सचिव मान.प्रशांत मेश्राम यांची नुकतीच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या विदर्भ प्रमुख म्हणुन निवड झाल्याने त्यांचा सत्कार निलेश केवट व मनोज सापेकर व धिरज भैसारे यांनी केले. तालुका धामणगाव रेल्वे जि.अमरावती या शहरातील भव्य ऐक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर दि.०९/१०/२०२५ रोजी उस्फूर्तने मोठ्या उत्साहात आनंदात पार पाडला.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कायद्याची जनजागृती करण्यात आली. माहिती अधिकार कायदा हा जनतेसाठी किती महत्वाचा आहे हे या कार्यक्रमातून नागरिकांना लक्षात आणून दिले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून, अमरावती जिल्ह्यातुन तसेच इतर जिल्हा, तालुक्यातून शेकडोच्या वॉर कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. जनतेला माहिती अधिकार कायद्याचे महत्व कळाले लागलेले आहे. आता या भारताचा सजग नागरिक असणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शन सचिन भाऊ मून यांनी केले व आभार प्रदर्शन मयूर राऊत यांनी केले. तसेच मेघा भोयर , शुभांगी गोमासे, आरती गायकवाड, नालंदा ठंगार, शैला येदुवंशी, दिपाली खंगार, राजीव बेग, पंजाब सरडे, प्रभाकर राऊत, कैलास डोले, चंद्रपाल रंगारी, विनोद कोष्टी, शेख मोबिन, अकोला नागेश नेमाडे, शिलवंत वानखडे, मंगेश कुलट, दिपक भैसारे, मयुर राऊत, निसार शेख धनजबु, पंकज गोमासे, व असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!