धामणगाव रेल्वे

“भाईगिरी” ची खाज असणाऱ्याचा दत्तापूर पोलिसांनी उतरविला माज

धामणगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच आरोपीची पायी वरात

धामणगाव रेल्वे

मागील काही काळात सातत्याने धामणगाव शहरातील गजबजलेल्या शास्त्री चौकात कधी शाळकरी मुलीचे छेड असो वा बाहेर गावावरून येणाऱ्या विध्यार्थ्यांना मारहाण असो हे प्रकार वाढतच होते. मंध्यंतरी काळात एका शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या मजनू ला पोलिसांनी घटनास्थळावरच प्रसाद दिल्याची घटना घडली होती. मात्र त्या नंतर काही टपोरींचे कारनामे थांबायचे नाव घेत नव्हते. काय तर म्हणे त्यांना भाईगिरी चा नाद….
असाच काहीसा प्रकार पुन्हा शहरातील शास्त्री चौकात घडला असून या वेळेस मात्र चक्क पोलिसांवरच हात उगारण्याचा प्रताप या स्वयंघोषित भाईगिरी करणाऱ्यांनी केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर अनेक नागरिकांच्या मनात धामणगावात पोलिसच सुरक्षित नाहीतर सामान्य नागरिकांचे काय ?असा रास्त प्रश्न नागरिकांपुढे उभा ठाकला होता. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दत्तापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ७ आरोपी यांच्यावर ३५३, १८६, ५०४, ३३२, १४३,१४७,१४९ अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. जतिन विक्की सोत्रे वय – १९, गौरव उर्फ युग विक्की सोत्रे – २०, रितिक मोहन चावरे- २०, विक्की मंगल सोत्रे – ४८, वेदांत संतोष चावरे -२०, मोहन मदन चावरे – ५० सह एक महिला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

हम पुलिस को नही मानते म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारकर्ता पोलीस कर्मचारी उमेश आसाराम यादव ब. न. १७७३ हे आपले पोलीस सहकारी सचिन हुकूम ब. न.६६१९ यांच्यासह सकाळी ०९;४५ ते १० च्या दरम्यान साध्या पोशाखात पेट्रोलिंग करीत असताना शास्त्री चौकात आरोपी हे एका शाळकरी मुलाला मारहाण करीत असताना दिसले ते सोडविण्यासाठी गेले असता आरोपीला पोलीस असल्याची बतावणी केली असताना देखी आरोपी क्र. १ व २ यांनी तुम बीच मी मत आव, हम पुलिस को नही मानते म्हणत मारहाण सुरु केली. यावेळी सदर प्रकरणाचा विडिओ रेकॉर्ड करीत असताना उर्वरित आरोपी यांनी महिला आरोपीला सोबत आणून त्या महिले थेट तक्रारदाराच्या गालावर थापड मारली आणि तू पोलीस असला तर काय झालं मी तुला खोट्या गुन्ह्यात फसविन अशी धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथडा सह सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

धामणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोपीची पायी वरात

दि. ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांसोबतच घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याचा हेतू असल्याने भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी आरोपीची घडलेल्या घटनाक्रमापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत पायी वरात काढण्यात आली. त्यामुळे सदरचा प्रकार पहिल्यांदाच होत असल्याने संपूर्ण शहरात आश्र्चर्य व्यक्त करण्यात आले तर अनेकांच्या तोंडून पोलीस प्रशासनाचे कौतुक सुद्धा करण्यात आले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!