धामणगाव रेल्वे

नैसर्गिक पाण्यालाही काही “मुजोर” लोकांचा मज्जाव

सरकारी रोडवर मुरुमाचे बांध टाकून अडविले नैसर्गिक पाणी

धामणगाव रेल्वे 

सध्यस्थित संपूर्ण तालुक्यात पावसाचे सावट पसरले असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु नैसर्गिक आप्पतीला कुणीही थांबवू शकत नाही. परंतु याच्या विपरीत तालुक्यातील गट ग्रामपंचायत जळगाव आर्वी अंतर्गत गंगाजळी गावात एक भलताच प्रकार समोर येत आहे. काही मुजोर लोकांनी नैसर्गिक पाणी अडवण्यासाठी चक्क सरकारी रोडवर मुरुमाचे बांध घालून पाणी अडविण्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पाणी समोर जात नसून एका नागरिकांच्या घरात नालीतील घाणपाणी परत येत असल्याने सातत्याने त्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत. मागील १५ दिवसापासून हा प्रकार घडत असल्याने त्या संदर्भात ग्रा. प. सरपंच, सचिव तसेच गटविकास अधिकारी याना तोंडी व लेखी दिले असताना अद्यापही त्या मुजोर लोकांवर कार्यवाही करण्यात आली नाही.

मजुरांनी काढल्यानंतरही त्या मुजोर लोकांनी रोडवर पसरवलेला मुरूम 

ग्रामपंचायत प्रशासनाच्या चुप्पीने मुजोर लोकांचे वाढले मनोधेर्य

ग्रामीण भागात सहसा नागरिकांनी कायदा जरी हातात घेतला तर ग्रामपंचायत मार्फत त्यावर ठोस कार्यवाही केली जात नसल्याने आपले काहीच वाकडे होत नसल्याचा उन्माद लोकांच्या मनात झालेला आहे. मात्र त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावे लागतो. वेळीच जर कार्यवाही झाली तर पुढचा व्यक्ती कायदा हातात घेण्यासाठी १० वेळा विचार करतो. सातत्याने गटविकास अधिकारी तसेच ग्रा. प. सचिव यांच्याशी चर्चा करून काळ दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रा. प. मार्फत २ मजुरांनी तब्बल सरकारी रोडवरील १ ट्रॅक्टर मुरूम काढून फेकला. मात्र मजूर लोक घरी जाताच परत त्या मुजोर लोकांनी मुरूम सरकारी रोडवर मुरूम आणून टाकला. म्हणजेच प्रशासनाचा कुठलाही धाक त्या मुजोर लोकांना राहिला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. वास्तविक पाहता सरकारी रोडवर अतिक्रमण करून इतर लोकांना त्रास देणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कार्यवाही करणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या ढिम्मपणा मुळे सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सलग ९ तास नालीतील घाण बाहेर काढताना

प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे वानखडे कुटुंबाला नाहक त्रास

त्याचाच प्रत्यय गंगाजळी गावातील सर्वसामान्य उत्तम वानखडे यांच्या कुटुंबाला आला आहे. १३ ऑगस्ट रोजी सततचा पाऊस असल्याने तसेच नालीतील घाणपाणी घरात शिरल्याने तब्बल ९ तास ती घाण बाहेर फेकण्याचे काम करावे लागले… त्यामुळे तातडीने त्या मुजोर लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वानखडे कुटुंबाने गटविकास अधिकाऱ्याकडे केली आहे…

गटविकास अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यावर वचक राहिला नाही ?

गंगाजळीतील समस्यांबाबत गटविकास अधिकारी योगेश वानखडे याना ८ ऑगस्ट ला व्हाट्सअँप वर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विषय सांगितला. त्यावर त्यांनीसुद्धा लगेच उत्तर देत कर्मचाऱ्यांना सांगतो म्हणून सांगितले. तसेच ११ ऑगस्ट रोजी लेखी तक्रार दिली असतानादेखील कुठलाही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आला नाही हे मात्र विशेष. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यावर वचक आहे कि, नाही हा प्रश्न या निम्मिताने उपस्थित होत आहे.

 

काही मुजोर लोकांनी जाणीवपूर्वक केलेल्या अतिक्रमणामुळे तसेच प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे मला व माझ्या कुटुंबाला सातत्याने १५ दिवसापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने प्रशासनाने त्या मुजोर लोकांवर फौजदारी कार्यवाही केली नाही. तर मला व माझ्या कुटुंबाला गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात मुक्काम ठोकावा लागेल.
      उत्तम वानखडे – नागरिक गंगाजळी

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!