अमरावती

लिंबाच्या झाडावरून तुफान राडा ; तरुणावर प्राणघातक हल्ला

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

अमरावती प्रतिनिधी

जिल्ह्यातील परतवाडा शहरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. रात्रीच्या सुमारास काही जणांनी पीडित व्यक्तीवर अचानक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका शुल्लक कारणावरुन हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या परतवाडा येथे रमेश कॉलनीत राम बघेल या व्यक्तीवर शनिवारी ७ जून रोजी प्राणघाती हल्ला झाला. लिंबाचे झाड का कापले यासारख्या शुल्लक गोष्टीवर तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण करतानाची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
लिंबाचे झाड कापण्यावरुन राम बघेल यांना मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटेजमध्ये काहीजण बाईकवरुन खाली उतरत कोणालातरी मारण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसते. आसपासचे लोक घरातून बाहेर आल्याचे देखील दिसते. मारहाणीदरम्यान काहींनी मध्यस्थी केल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते.
मारहाण प्रकरणी परतवाडा पोलीस स्थानकामध्ये आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने तपासाला वेग येईल असे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!