क्राईम

लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात ; १४ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता मागितली लाच

मलकापूर :जनसूर्या मीडिया

रेती वाहतुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता दोन महिन्याचे १६ हजार रूपयांची मागणी करून तडजोडीअंती १४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन देवचंद माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाच्या पथकाने आज २३ मे रोजी ताब्यात घेत कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रेती व्यावसायीक यास त्याचा रेतीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन देवचंद माळी यांनी माहे एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रत्येकी ८ हजार रू. असे १६ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात १३ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रारदाराने तक्रार नोंदविली होती.
त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील मुंधडा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शिवनेरी ढाब्यावर रेती व्यावसायीक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दोघांमध्ये तडजोडीची बैठक झाली. त्यात लाच पडताळणी विभागाने एकूण मागणीच्या १६ हजार रूपयांपैकी १४ हजार रूपये स्विकारतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाच्या पथकाने रंगेहात पकडले.
सदरची कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनात सापळा अधिकारी मिलिंदकुमार बहाकर पोलीस उपअधिक्षक, पोलीस अंमलदार प्रदिप गावंडे, दिगांबर जाधव, संदिप ताले, असलम शहा सर्व ला. प्र. वि. अकोला यांनी पार पाडली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!