अकोला क्राईम

उधारीत मोबाइल घेणं ठरली जीवनातील सर्वात मोठी चूक ! युवकाने गळफास घेऊन संपविले जीवन

मोबाईलची उधारी न भरल्याने धिंड काढत मारहाण, अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

अकोला प्रतिनिधी : अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान उधारीने घेतलेल्या मोबाईल चे पैसे न भरल्यामुळे मोबाईल दुकान मालक आणि त्याच्या सोबत गळ्यांनी सागर चिकटे या तरुण युवकाला त्याच्या गावात जाऊन जबर मारहाण केली.
मोबाईल दुकान मालक एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्याला पळून पळून मारले आणि नंतर गावात धिंड काढली तर चार चाकी बुलेरो गाडीत बसून अपहरण करून त्याला गावाबाहेर नेण्यात आलं. यादरम्यान सागरला जबर मारहाण ही करण्यात आली होती. याचाच पश्चाताप सागरच्या मनात आला, आणि त्यांनी मोठा निर्णय घेतला.
गावात धिंड काढल्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
अकोला जिल्ह्याच्या तेल्हाराच्या जस्तगाव शेतशिवार परिसरात निंबाच्या झाडाला शेतातच गळफास घेऊन गुरुवारी मध्यरात्री सागरने आत्महत्या केली. दरम्यान दुसऱ्यादिवशी शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मनोहर चिकटे हा ट्रॅक्टर घेऊन शेतात कामाला गेलेल्या असता त्याला स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत सागर हा मृत’शव अवस्थेत दिसून आला.
दरम्यान या प्रकरणी सचिन चिकटे यांनी सागरच्या मृत्यूस कारणीभूत मोबाईल दुकान मालक व त्याच्या साथीदारा विरोधात तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तक्रारीत साखरच्या मृत्यूस जबाबदार विनायक राऊत रा. तेल्हारा, रामप्रसाद मोकळकार रा.भोकार, उमेश पांडे रा.तेल्हारा, अक्षय भारसाकळे रा.वाडी तेल्हारा, विनीत युतकार आणि यश युतकार रा.तेल्हारा यांच्या विरोधात मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मोबाईल दुकान मालकच, सागरच्या मृत्यूस कारणीभूत नातेवाईकांचा आरोप

पोलिसांकडून दिलेल्या माहितीवरून, मोबाईलच्या उधारीचे पैसे न दिल्याने हा सर्व प्रकार घडला असून सागर दळपणात आला आणि त्याला गावात केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या पश्चातापात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.. सागरच्या आत्महत्येस कारणीभूत मोबाईल दुकान मालक आणि त्यांचे पाच साथीदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून संबंधिता विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!