आरोग्य विषयक धक्कादायक

अखेर……. “त्या” बोगस डॉक्टर वर गुन्हा दाखल

राज्य मानवी हक्क आयोगाकडून संपादक देवेंद्र भोंडे यांच्या तक्रारीची दखल

सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं – देवेंद्र भोंडे, संपादक

चांदूररेल्वे ; प्रतिनिधी 

कारला येथील एका कथित डॉक्टरांच्या दवाखान्यात धाड टाकून त्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. सुजल समर विश्वास असे या बोगस डॉक्टरांचे नाव आहे. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे वैधकीय प्रमाणपत्र नसताना तो प्रॅक्टिस करीत असताना आढळून आला. तसेच त्याच्या दवाखान्यात कुठल्याही प्रकारचे बोर्ड लावले दिसले नाही. त्यामुळे वैधकीय अधिकारी प्रियंका निकोसे यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलीस स्टेशन येथे सदरच्या बोगस डॉक्टर वर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोग्य विभागाच्या नाकावर टिच्चून करत होता रुग्णांच्या जिवाशी खेळ..!

कारला येथील बोगस डॉक्टर बरेच काळापासून आपला दवाखाना चालवीत होता. या संदर्भात गावाकडची बातमी चे संपादक यांनी प्रथमतः या बोगस डॉक्टर वर कार्यवाही करण्यासंदर्भात आवाज उठविला तर प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊनही बोगस डॉक्टर बिनधास्त पणे आरोग्य विभागाच्या ढिसाळलेल्या कारभारामुळे “कारला” या गावीत रुग्णांच्या जिवाशी खेळत होता. मात्र आरोग्य विभागाला याची कुन कूनही लागली नव्हती.
गावाकडची बातमी चे मुख्य संपाद क देवेंद्र भोंडे यांनी वारंवार तक्रारी देऊन ही जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नव्हती म्हणुन त्यांनी मुंबई मानवी हक्क आयोग महाराष्ट्र यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती.

आतापर्यंत कारवाई का झाली नाही.!

संबंधित बोगस बंगाली डाक्टर ला सहकार्य करणाऱ्या त्या आरोग्य विभागाच्या तालुका अधिकाऱ्यांवर सुध्दा कारवाई करण्यास दिरंगाई केल्याबद्दल शिस्तभंग कारवाई करावी. अशी मागणी देवेंद्र भोंडे यांनी मानवी हक्क आयोगकडे केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!