अमरावती धक्कादायक

आशा सेविकेकडून ३ महिन्याच्या गर्भवती मातेला अमानुष मारहाण

पोटावर आणि गुप्तांगावर मारल्या लाथा ; दातही पाडले

अमरावती प्रतिनिधी -:

अशा सेविका म्हणजे महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यक्ती जिला शासनाकडून महिलेच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिले असते. मात्र या विपरीत चिखलदरा तालुक्यात अमानवीय घटना घडली असून चक्क एका अशा सेविकेने ३ महिन्याच्या गर्भवती महिलेच्या पोटावर, गुप्तांगावर लाथा मारत तिचे दात पाडल्याची तसेच गर्भवती मातेच्या पतीलाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिखलदरा तालुक्यातील डोमा गावात ही धक्कादायक घटना आहे. घराच्या बांधकामावरून झालेल्या किरकोळ वादातून एका आशा सेविकेनेतीन महिन्यांची गर्भवती महिला आणि तिच्या पतीवर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगावर गंभीर मारहाण करण्यात आली, तसेच तिचे दातही पाडण्यात आले.
हल्लेखोर आशा सेविकेने पीडित महिलेच्या पतीवरही लाकडी काठीने हल्ला केला. या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आशा सेविकाआणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे. महिलांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या आशा वर्करकडूनच असा अमानवी प्रकार घडल्याने आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!