क्राईम

राघव पेट्रोल पंप लुटणाऱ्या दरोडेखोरांना अवघ्या ३ तासात अटक

स्था. गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन तळेगाव पोलिसांची प्रशंसनीय कारवाई

धामणगाव रेल्वे 

दि. ४ शुक्रवार रोजी रात्री ८ च्या दरम्यान अज्ञातांनी नागापूर येथे असलेल्या राघव पेट्रोल पंप वरील दोन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांना धक्का बुक्की करीत खोलीत बंद करून विक्री झालेल्या पेट्रोल चे नगदी अंदाजे ३ ते ४ लाख रुपये लूटमार करून पसार झाल्याची घटना उघडकीस आली.
          सदरची माहिती पेट्रोलपंप व्यवस्थापक अभय नरेश राऊत रा. जळका पटाचे यांनी ११२ व कॉल करून पोलिसांना माहिती दिली. त्यावर तळेगाव पो.स्टे. चे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भेट दिली. त्याच पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार चा. रेल्वे आणि स्था. गुन्हे शाखेचे पो. नि. किरण वानखडे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून घेत जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून लूटमार करणाऱ्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी आजू बाजूच्या जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली.

पेट्रोल पंप व्यवस्थापक अभय राऊत च निघाला दरोडेखोरांचा मुख्य सूत्रधार

दरम्यान पेट्रोल पंप मॅनेजर व कर्मचारी याना सदरच्या विषयाबाबत पोलीस प्रशासनाने विचारपूस केली असता त्यांच्या सांगण्यात तफावत येत असल्याने त्यांच्यात संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे या घटनेबाबाबत सखोल विचारपूस करण्यात आली असता प्रथम उडवाउडवीची उत्तर देण्यात आले मात्र पोलिसी खाक्या दाखवताच पेट्रोल पंप मॅनेजर अभय नरेश राऊत रा. जळका पटाचे, राहुल धराज धोरते वय-२३, रा. सालोड ह. मु. जळका पटाचे यांनी संगतमत करूनआपले सहकारी हृतिक शंकर टेकाम , वय – २२ रा. येनस यांचे इको वाहन वापरून समित चंद्रकुमार कणसे वय – २७, श्रावण उर्फ लहान्या राजेंद्र कणसे, वय – १९ यांच्या मदतीने पेट्रोल पंपावरील रक्कम लंपास केल्याची कबुली दिली. त्यानुसार वरील ५ हि आरोपीना अटक करण्यात आले असून त्यांच्या कडून वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे तर चोरी गेलेली रक्कम ३ लाख ६ हजार आरोपीकडून जप्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. तसेच पुढील तपास ठाणेदार रामेश्वर धोंडगे तळेगाव पो. स्टे करीत आहे.
सदरची कारवाही विशाल आनंद पो. अधीक्षक अमरावती ग्रामीण, पंकज कुमावत अप्पर पो. अधीक्षक अमरावती ग्रा. अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनात पो. नि. किरण वाघमारे ठाणेदार रामेश्वर धोंडगे पो. उप. नि. सागर हटवार मूलचंद भांबुरकर अमोल राठोड पो. अंमलदार सचिन मिश्रा, शकील चव्हाण, बळवंत दाबणे, मंगेश लकडे, गजेंद्र ठाकरे, दिनेश कनोजिया, सचिन मसांगे, रवींद्र बावणे, सचिन गायधने, विनोद राठोड, भूषण पेटे, पवन आलोने, संदेश चव्हाण, पंकज शेंडे, अमर काळे, जितेंद्र राऊत, बंडू मेश्राम, गौतम गवळी, या पथकाने केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!