अमरावती सामाजिक

रस्ता डांबरीकरणाबाबत माजी सभापती सचिन पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

पत्राद्वारे मांडली आयुक्तांसमोर रस्त्याची दयनीय अवस्था

तपोवन गेट ते डेन्टल कॉलेज चांदुर रेल्वे मार्ग रस्ता पूर्णपणे निखडला

अमरावती – प्रतिनिधी

येथील तपोवन गेट संत गाडगेबाबा विद्यापीठ गेट मागील डेन्टल कॉलेज ते चांदुर रेल्वे रस्त्यालगत कॅथलीक चर्च पर्यत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून जागोजागी जिवघेणे खड्डे पडलेले आहे. चारचाकी सह दुचाकी वाहन सुद्धा या रस्त्याने चालविणे कठीण झाले आहे. तसेच अनेक छोटे मोठे अपघात सदर रस्त्यावर घडलेले असून भविष्यात मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याची अवस्था अत्यंत जिवघेनी झाली असुन भविष्यात आणखी दाट होण्याची शक्यता आहे.
           त्याकरिता तातडीने सदरच्या रस्त्याची पाहणी करुन योग्य ती व्यवस्था करावी व रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण इत्यादी कामे तातडीने करावे अशी मागणी परिसरातील नागरीकांची वतीने माजी सभापती सचिन पाटील यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांपुढे केली आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!