अमरावती

नवीन जीआर नुसार आस्थापनेत रुजू करण्याबात शिक्षक प्रशिक्षणार्थीचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन

शिक्षक प्रशिक्षणार्थीचे विविध मुद्द्यांवर सहाय्यक आयुक्तांशी सकारात्मक चर्चा

अमरावती -प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या नवीन जीआर नुसार ५ महिन्याच्या कालावधी वाढ झाली असून त्यामध्ये इतर आस्थापनेत प्रशिक्षणार्थी रुजू झाले मात्र शिक्षक प्रशिक्षणार्थी याना अद्यापही आस्थापनेत रुजू होण्याबाबत स्पष्टोक्ती नसल्याकारणामुळे दि. ३ एप्रिल २०२५ रोजी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग सहाय्यक आयुक्त अमरावती यांना विवाहित मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने शिक्षक प्रशिक्षणार्थी व संपूर्ण जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांना त्यांना त्यांच्या आस्थापनेमध्ये रुजू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
तसेच सहाय्यक आयुक्त त्यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करण्याबाबत, नवीन जीआर नुसार ५ महिन्याचा कालावधी वाढ झालेला असून त्यामध्ये १ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना रुजू करण्यात यावे, बायोमेट्रिक सुविधा कधीपासून सुरू होईल, रखडलेल्या मानधनाबद्दल तसेच हजेरी पत्रक याबद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली.
 या सर्व मुद्द्यांवर सहाय्यक आयुक्त मॅडम यांनी सकारात्मक चर्चा केली व पुढील काही दिवसांमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी यांना त्यांच्या आस्थापनेमध्ये रुजू करण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्यांनी कोणते प्रकारची मनात भीती बाळगु नये. असे सहायक आयुक्त मॅडम यांनीआश्वासित केले.
यावेळी अमरावती जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!