राजकीय

ग्रामीण भागात वीरेंद्र जगताप याना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

प्रतिनिधी

धामणगाव मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या विधानसभा निवडणूक २०२४ च्या निमित्ताने जन आशीर्वाद यात्रा तथा सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोखड, शिरपूर, वाघोली, कोदोरी, पिंपळगाव (बैनाई), गौरखेडा, नांदसावंगी, रोहणा, जावरा, खंडाळा, पळसमंडळ, धानोरा गुरव या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून सुसंवाद साधला.

ग्रामीण भागातील जनता आजही मूलभूत गरजांच्या समस्येची झुंज देत आहे. समस्या सोडवण्यासाठी एक प्रभावी नेतृत्व करणारा नेता पाहिजे. असे मत जनतेने यावेळी मांडले. महाविकास आघाडी पक्षाच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास दर्शवित जनतेने पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रा. विरेंद्र जगताप यांनी जनतेला आश्वासन दिले की, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील यावेळी या जन आशीर्वाद यात्रेला ग्रामस्थांकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!