धामणगाव रेल्वे

धामणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत ज्वारी खरेदीचा शुभारंभ

धामणगाव रेल्वे –

धामणगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत ज्वारी खरेदीचा शुभारंभ श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारात शनिवारला (ता.२५) करण्यात आला.शुभारंभ प्रसंगी ज्वारीला मिळाला २ हजार ३११ रुपयांचा प्रती क्विंटल भाव मिळाला.

                येथील कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकरी बंधुला सेवासुविधे करीता ओळखली जाते. तालुक्यातील शेतक-यांना शेतमालाची विक्री व योग्य भाव देण्याबाबत समिती तत्पर आहे. या आधी तिळ खरेदी सुरु करण्यात आली होती. तिळ खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.शेतकरी बंधुंना गावातच योग्य भाव मिळत आहे. तिळ सोबतच शनिवारला (ता.२५) बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारात ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाला आडते संतोष राजनकर यांच्या आडत मध्ये नागापुर येथील अरुण गाडेकर यांच्या ज्वारीला २ हजार ३११ रुपये भाव मिळाला. गिरीष भुतडा, अंकुश दुर्गेकार, सचिन राठी, राधेश्याम चांडक व मनिष भट्टड यांच्या खरेदी मध्ये शुभारंभ झाला. प्रथम शेतकरी अरुण गाडेकर यांचा शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे निरीक्षक दिनेश गोमासे यांच्या हस्ते शेतकरी बंधु ला शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

              या प्रसंगी समितीचे आडते रितेश राठी, दिपक राजनकर,  भालेराव, अशोक कांकरीया, राजेन्द्र पनपालिया, व्यापारी सचिन मुंधडा, मनिष केला, कैलास राठी, नंदलाल राठी,मुकेश पनपालिया,रुपेश वानखडे, निलु पनपालिया, देवराव कापसे,संतोष लाहोटी, आनंद कांकरीया, समितीचे कर्मचारी यार्ड प्रमुख संजय तुपसुंदरे, राजु तायडे, दिलीप पाटील,भुषण जुमडे,कविश मेटे,रामेश्वर वानखडे यांच्यासह शेतकरी, आडते, व्यापारी हमाल बंधु कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          तिळ, ज्वारी,सोयबिन् तुर चना भुईमुंग खरेदी सुरु केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बंधुना गावतच योग्य भाव मिळत असुन चांगल्या सेवासुविधा समितीने उपलब्ध करुन दिल्या बद्दल संचालक मंडळ, सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती मंगेश बोबडे व प्रशासनाचे कौतुक होत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!