धामणगाव रेल्वे

शेंदुरजना खुर्द येथे १३३ व्या भीम जयंतीचा जल्लोष

प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे

अख्या जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजना खुर्द या गावी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी भीम जयंती निमित्त गावामध्ये भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात होते. रॅलीमध्ये डीजे, लेझीम, लाठीकाठी चा समावेश असून थोर पुरुषांचे विचार मांडण्यात आले. तर समाज जागृतीची कामे भिम शुभ्रतारा उत्सव समिती यांनी हाती घेतले होते.

१४ एप्रिल डॉ. भिमराव आंबेडकर यांची १३३ वी जयंती निम्मित काढण्यात आलेल्या भव्य दिव्य रॅलीला लहान्यापासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. या रॅलीमधील समस्त भीम अनुयांसाठी शिवजयंती उत्सव समिती तर्फे शरबत वाटण्यात आले होते. रॅलीमध्ये समस्त गावकरी मंडळींनी सहभाग घेतला होता. तर मोठ्या जयघोषाने महामानवाचे जयंती गावात साजरी करण्यात आली. सदरील भीम जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम शुभ्रतारा उत्सव समितीने अतिशय मेहनत घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!