धामणगाव रेल्वे – सचिन मुन
कर्मयोगी फाउंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्त्वावर कर्मयोगी फाऊंडेशन बऱ्याच काळापासून आपले सामाजिक उपक्रम राबवत असून या कर्मयोगी फाउंडेशन तर्फे प्रत्येक महिन्याला कूबडी वाटप तर गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन वाटप करत असतात. कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सावळा येथील ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच ५० महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकाराचा सत्कार करण्यात आला सत्कारमुर्ती म्हणून संतोष वाघमारे, गजानन फिरके, सचिन मुन, राहुल चौधरी, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.














Add Comment