धामणगाव रेल्वे:-
मातोश्री फाउंडेशन व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मंगरूळ दस्तगीर येथे घेण्यात आलेल्या विधवा, निराधार, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप हा कार्यक्रम म्हणजे आपणही समाजाचे देणे लाभतो ही भावना मातोश्री फाउंडेशन नेहमी लक्षात ठेवून समाजासाठी काम करत असते असे मत अस्तित्व किन्नर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आम्रपाली ताई यांनी बोलताना व्यक्त केले.
मंगरूळ दस्तगीर येथे मातोश्री फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेने बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्कार तसेच रस्त्याने फिरणाऱ्या मनोरुग्ण यांच्यासाठी ही संस्था काम करते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी महिला मेळावा आयोजित करून महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आरोग्य विषयक मार्गदर्शन आर्थिक मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला सुदाम देशमुख (सेवानिवृत्त न्यायाधीश मुंबई) अँड. सोनाली काळे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. मंगरूळ दस्तगीर ठाणेदार सुलभा राऊत यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचार याबद्दल मार्गदर्शन केले. डॉक्टर सविता अप्तुलकर, सोनाली देशमुख ( शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विदर्भ संघटक) यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली. त्यानंतर मंगरूळच्या ठाणेदार सुलभा राऊत यांच्या हस्ते मातोश्री महिला अत्याचार निर्मूलन व समुपदेशन समितीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.














Add Comment