अमरावती

अपघाताची भीषणता कमी करण्यासाठी सहावी च्या विध्यार्थाचा अफलातून जुगाड

अमरावतीचा विध्यार्थी अवनिष राम बावस्कर सी बी एस इ चे संचालक डॉ. जोसेफ एम्मन्युल याच्या हस्ते पारितोषिक प्रदान…

अमरावती प्रतिनिधी –

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सी बी एस इ यांच्या वतीने “राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन” मयूर स्कूल नोएडा दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनी मध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स अमरावती चा विद्यार्थी अवनिष राम बावस्कर वर्ग ६ याने सुरक्षित इंधनाची टाकीची प्रतिकृती बनवली या प्रतिकृतीची दळणवळण आणि वाहतूक या प्राथमिक विभागातुन प्रथम निवड करण्यात आली आहे . त्याकरिता सी बी एस इ चे संचालक डॉ जोसेफ एम्मन्युल याच्या हस्ते अवनिष राम बावस्कर याला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ विदर्भ ट्रॅव्हल्स बस चा भीषण अपघात होऊन डिझेल टाकीचा चा विस्फोट झाला आणि या आगीत २५ प्रवाशांचा आगीने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.जर या ठिकाणी डिझेल टाकीची गळती झाली नसती, आग लगेच विझवता आली असती तर २५ निरपराध प्रवाशांचा जीव वाचवता आला असता. पुढे भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून ही नाविन्यपूर्ण कल्पना अवनिष ला सुचली ज्यामध्ये एकच इंधनाच्या टाकी ऐवजी चार इंधनाच्या टाकी एकमेकांना जोडलेल्या आहेत ज्यामुळे अपघाताची भीषणता कमी करता येईल. तसेच प्रत्येक टाकी ही दोन थरांपासून बनलेली असेल ज्यामध्ये पहिला थर हा धातूचा असेल तर दुसरा थर हा सिलिकॉन फायबर चा धक्के शोषून घेण्याचे काम करेल जेणेकरून इंधनाच्या टाकीला मार बसणार नाही आणि ती फुटून गळती होणार नाही आणि इतके करुन जर टाकी मधून इंधनाची गळती झाली असेल तर असे कंट्रोल युनिट वापरले आहे जे टाकी मधून इंधनाची गळती झाल्यास अग्नी रोधक यंत्राला सुरू करणार व त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल च्या गळतीमुळे आग लागणार नाही. या विद्यार्थ्याला मार्गदर्शन विज्ञान शिक्षिका शीतल जाधव तसेच विज्ञान शिक्षक कृष्ण किशोर यांनी केले.
तसेच विदयालयाचे प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नाहर, सारिका वर्मा,विज्ञान व अटल लॅब चे शिक्षक तसेच विदयालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!